१५ जुलै रोजी करिअर विषयक समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन
१५ जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर विषयक समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन

 

ठाणे 

 

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व रायगड-अलिबाग यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त बुधवार दिनांक 15 जुलै, 2020 रोजी दुपारी 03.00 वाजता ऑनलाईन पध्दतीने बेरोजगार उमेदवारांकरीता करिअर विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या करिअर विषयक समुपदेशनाचे मार्गदर्शक श्री. शालीक गि. पवार, ( बी.ए.

बीएड., डिप्लोमा इन व्होकेशनल गाईडन्स), सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग- हे आहेत. सदर वेबीनार गुगल मिट या अॅपवर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेण्याकरीता https://bit.ly/2DhGegG या लिंकवरील फॉर्ममध्ये आपली वैयक्तिक माहिती भरुन सबमीट ऑप्शनवर क्लीक करुन नोंदणी

करावी आणि करिअर विषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा  पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही अडचण येत असेल तर ९४२१०१६२७० /९६६९८१२००९ किंवा ९८९२५२४६८५ या नंबरवर संपर्क साधावा.असे आवाहन श्रीमती कविता ह. जावळे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

 








 







Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image