विचाधारेशी ते एकनिष्ठ असतात

7/12/2016,


+91 99873 32775:


सकाळचे पत्रकार सिद्धेश्वर डुकरे यांनी लिहिलेला छान लेख..
स्वतः ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या आपण सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा...
----------------------
आरएसएस खरच एक सभ्य आणि विचारी लोकांची संघटना आहे, त्याचा विरोध करून आपली वैचारिक कूवत दाखवणारे अनेक आहे
पण एकदा वाचा


आरएसएस आणि त्यांच्या विचारधारा या मातीत रुजायला ९० वर्षे गेली. त्यांच्या अनेक विचारांशी तुम्ही आम्ही सहमत नसाल तरी
तुम्हाला हे मान्य करावे लागेल. त्यांच्या विचाधारेशी ते एकनिष्ठ असतात
ते पुस्तके आणि माणसे वाचत असतात
त्यांचे प्रशिक्षण कायमच चालू असते
ते नियोजन करतात , ते अमलात आणतात
त्यांच्या प्रत्येक कृतीमागे अजेंडा असतो
ते महा नसले तरी पण ते 'संघ'टीत आहेत
ते शिस्तप्रिय आहेत,
त्यांचे काम ते व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात ..
ते नित्यनियमाने एकमेकांना भेटत असतात ...
त्यांच्या कामासाठी ते बैठका घेत असतात ...
त्यात ते आढावा घेत असतात ...
पुढील कामे ठरवीत असतात


उपाशीपोटी परत कोणाला पाठवायचे नाही हि ग्रामीण संस्कृती ते पुरेपूर जाणतात.. म्हणूनच ते शिधा संकलनासाठी एक लाख घरापर्यंत पोहोचतात ....
ते आधुनिक तंत्रज्ञानाचा चा पुरेपूर उपयोग करतात ...
म्हणूनच ते १. ५ लाख स्वयंसेवक बारकोडई ने नोंदणी करतात ....
त्यांचा अजेंडा राबविण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात ....
म्हणूनच ते त्यांची नव्हे तर तुमची भाषा बोलतात ....
तुमची प्रेरणास्थाने अचूक हेरतात....


ते नुसतेच एकत्र येत नाहीत तर ते
कला क्रीडा सहकार शिक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रातही संस्थात्मक रूपाने कार्यशील असतात ....
त्यांचे धेय्य ठरलेले आहे ते पाय रोवत पुढे चालले आहेत
म्हणूनच पुरोगामी महाराष्ट्रात ते क्रियाशील राहून टिकले


आता आपण...........


आम्ही साधे दर महिन्याला भेटत नाही ...
आम्ही नियमित बैठका घेत नाही ...
आम्ही समाजात पोहोचत नाही ...
आम्ही संस्थात्मक कामात अग्रेसर नाही ...
आम्ही फक्त बोर्ड लावण्यात समाधानी असतो ....
आम्ही आढावा घेत नाही देत पण नाही ....
दिलाच तर १०० % खरच असतो अस नाही ...
आम्ही पुस्तक पण वाचत नाही म्हणूनच मस्तक घडत नाही
आमच्या महापुरुषाचे कृतीशील वारसदार होत नाही....
त्यामुळे आमच्या कृतीशिलतेचे क्रियाकर्म घातले तर नाही ना ?
आम्ही ठरवलेली गोष्ट प्रत्यक्षात आणत नाही
आमचे ध्येय धोरण अमलात आणण्यासाठी आम्ही किती काम करतो याचा आम्ही विचार करत नाही
आम्हाला नोंदणी करण्यासाठी १०० वेळा फोन करावा लागतो
आम्हाला कामासाठी पाठपुरावा करावा लागतो
आम्ही मीटिंग साठी कधी सिटींग करत नाही
तरीदेखील आम्ही आमच्याच विश्वात आहोत


आम्हाला ज्या दिवशी भान येईल तेंव्हा वेळ गेलेली असेल
म्हणूनच म्हणतो विचारांचं,आचारांच तोरण बांधूया
झपाटून कामाला लागुया,
थोडाच वेळ द्या पण परिणामकारक काम करा


समाजासाठी कामाचे असेल असे काही तरी करूया
आयुष्याच्या आलेखात समाजसेवेसाठी द्याल तो वेळ कारणी लागेल असे काम करूया.
--------------------------------------------------------


आपला समाज "संघटीत" होण्यासाठी बाबासाहेबांवर जी वेळ आली होती आणि त्यांनी ज्या हालअपेष्टा सहन केल्या होत्या त्या "ज्यांनी" कोणी दिल्या होत्या ते आता खुप हुशार झाले आहेत कारण त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचलेच आहेत "गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या तरच तो बंड करून उठेल".... आणि मग आजच्या गुलामाला (ज्याला तिळमात्रही जाणिव नाही आहे की तो कसला कसला गुलाम" राव" आहे कि गुलाब"राव" आहे) जमल तर Enjoyment, Entertainment Life मधून उठेल आणि थोडाफार कामाला लागुन भरपुर सार्‍या गोष्टी FB, Twitter, WtsApp नक्कीच पोस्ट करेल....


कारण आपल्याला आपण गुलाम आहोत ह्याची जाणीव करून देणे त्यांनी केव्हाच बंद केले आहे... कारण त्यांनी हेरले की त्या जातीयवादी Treatment चे Results ईतके महागात पडले आहेत कि डोक्यावरचे "तख्त" आणि प्रुष्ठ भागावरचे रक्त एवढे गेले आहे कि आता वेगळे आणि छुपे डावपेचच आखावे लागतील...


राहीला आपल्या समाजाचा प्रश्न... डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढले आम्ही तर या देशातील खरे राजे होतो.... आणि त्यांनी प्रामाणिक पणे ते राजेपण आम्हास परत मिळवून दिले... (SC, ST, 40% काढा कुठल्याही Engineering College मध्ये Admission हमखास).. जे खरेच या देशाचे नाहीत ते सारे जीव काढुन अभ्यास करून 92% काढुन देखील Commerce ला Admission घेत आहेत कारण Science ला admission न मिळाल्याने.....