अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण


मुंबई


अभिनेते अमिताभ बच्चन यांची COVIDE-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनीच ट्विटरवरून दिली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेकसुद्धा COVID19 पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.


या आधीही बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांचं शुटिंग बंद असल्याने अमिताभ हे घरीच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना तातडीने नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.