जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन
ठाणे
लॉकडाऊन काळामध्ये शिथिलता दिल्यानंतर जिल्ह्यातील अनेक औदयोगिक कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. परप्रांतीय मजूर बाहेरगावी गेल्यामुळे कंपन्यांना मनुष्यबळाची उणीव भासत आहे.ही पदे भरून बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र.ठाणे यांनी दिनांक 07 जुलै 2020 ते दिनाक 15 जुलै 2020 पर्यत ऑनलाईन मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
लॉकडाऊन नियमांच्या आधीन राहन औद्योगिक कंपन्यांचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहेत. परंतू असंख्य मजूरांनी स्थलांतर केल्याने कंपन्यांना आता मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. अनेक कंपन्यांना कामगार मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मनुष्यबळाची उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांनी जिल्हा कौशल्य विकास केंद्राकडे मागणी केली आहे. दहावी, बारावी आणि पदवीधर, विषेशतः प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशियन उमेदवारासाठी कंपन्यानी संधी उपलब्ध करून दिली आहेत..
इच्छूक उमेदवारांनी www.ncs.gov.in या NCS पोर्टलवर व विभागाच्या https://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर (नोंदणी केली नसल्यास) जॉबसिकर म्हणुन नोंदणी करावी.नंतर जॉब फेअर व इव्हेंट टॅबमधिल Online Job fair at Thane 7 July 2020 to 15 July 2020 ला क्लिक करुन Proceed क्लिक करावे व उपलब्ध असलेल्या रिक्त पदांपैकी आपण इच्छुक असलेल्या पदांकरीता खालील उद्योजकांवर क्लिक करावे.
1)Think Unified Resources Pvt, 2) Reliable first Adcon Pvt Ltd.3) kapston facilities management. 4)silver leaf corporation.5)Rinfra JV Adulji त्या नंतर submit participation ला क्लिक करावे.
15 जुलै पर्यंत कौशल्य विकास विभागाच्या वेबसाईटवर www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉग ऑन करून शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी पसंतीक्रम नोंदवावा. यानंतर उमेदवारांना उदयोजकांच्या सोयीनुसार शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. अधिक माहिती करीता कविता जावळे (९७६९८१२००९) व आशुतोष साळी (९८९२२५२४६८५) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे अहवान सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,ठाणे. कविता व.जावळे यांनी केले आहे.