रिपाइं व कामगार आघाडीच्या वतीने ठाणे शहरात जाहीर निषेध

 ठाणे 
    
विश्वरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर काल दिनांक 07/07/20 रोजी  संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे.
काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय.  
सदर घटनेचा रिपाइं व  कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रदीपभाऊ कांबळे व सचिव गुणवंत नागटीळे व महाराष्ट्र प्रदेश सचिव भास्कर वाघमारे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शहाजीराव दुपारगुडे व ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद मगरे  प्रमोद इंगळे , ठाणे जिल्हा अध्यक्ष कामगार आघाडी अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  ठाण्यातील वागळे इस्टेट विभागातील रामनगर रोड नं.28 येथे सोशल डीस्टंस ठेवून निषेध जाहीर  करण्यात आले  त्यावेळी शहर उपाध्यक्ष चंद्रकांत भंडारे, शाखा अध्यक्ष, अरुण सूर्यवंशी, कार्यकर्ते - सागर वाघमारे, बलभीम सोनकांबळे, शामु शिंदे,करण घाडगे, साहिल लोंढे, संतोष आदी पदाधिकारी उपस्थित होते .आरोपींवर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे तसेच आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई न झाल्यास पुन्हा ठाणे शहरात तीव्र आंदोलन करू असा इशारा सरकारला देण्यात आला आहे.


 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image