ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ९ हजार ८२५ कोरोना रूग्ण बरे
ठाणे
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ५ हजार ८१४ रूग्ण उपचार घेत असून ९ हजार ८२५ कोरोना रूग्ण बरे झाले तर ५७६ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ५ हजार ९१० रूग्ण उपचार घेत असून १० हजार ४२८ बरे झाले तर २६४ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ८९६ रूग्ण असून ७ हजार ७१८ बरे झाले तर ३५२ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ५३४ रूग्ण उपचार घेत असून ५ हजार ६७ कोरोनातून बरे झाले तर २३३ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये २ हजार ३६२ रूग्ण असून ३ हजार ४१२ बरे झाले तर ९२ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ५७९ रूग्ण उपचार घेत असून २ हजार ४९७ कोरोनातून बरे झाले तर १८० जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५१३ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून २ हजार ५७६ बरे झाले तर १२१ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ६६४ रूग्ण असून १ हजार ३३८ कोरोनामुक्त झाले तर २९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ हजार १९८ रूग्ण असून २ हजार २१५ बरे झाले तर १२० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात काल 21 जुलै रोजी कोरोनाचे १ हजार ३२३ नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात सद्यस्थितीत २३ हजार ४७० कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत १ हजार ९६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४५ हजार ७६ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण ७० हजार ५१३ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत.