ब्रह्मांड कट्टयावर ऑनलाइन डॉक्टर कोविड वॉरियर्स कार्यक्रम संपन्न
ठाणे
कोरोनाचे संकट घोंगावू लागल्याने गेल्या चार महिन्यापासून लॉकडाउन सुरु आहे. पण या सगळ्या संकटावर पहिल्या फळीत लढणारे आहेत "डॉक्टर". त्यांच्याच अविरत श्रमाला सलाम करत अशाच दोन कोरोना यौध्दे म्हणजेच डॉक्टरांचा परिसंवाद ब्रह्मांड कट्टयावर फेसबुक व यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. डॉ. प्रमोद कोलगे (एम. डी) व डॉ. श्यामसुंदर पालीवाल (फैमिली फिजिशियन) या ब्रह्मांड परिसरातील डॉक्टरांशी मुलाखत स्वरुपात ब्रह्मांड कट्टयाचे अध्यक्ष महेश जोशी यांनी संवाद साधला.
साधारण मार्च पासून भारतात कोरोनाच्या महामारीस सुरुवात झाली. याची चाहूल त्यापूर्वीच वैद्यकीय क्षेत्रातून प्रसिद्ध झालेल्या पत्रातून किंवा प्रसार माध्यमातून डॉक्टरांना लागली होती व त्या दृष्टीने हळुहळु नियोजन करणास सुरुवात झाली होती असे अनुभवी डॉक्टर कोलगे यांनी सांगितले. या सुरुवातीच्या कालावधीत त्यांनी त्यांची क्लिनिक चालू ठेवली होती. पंरतू त्यांना नियमीतपणे औषधोउपचारांची गरज असे उदा. मधुमेह, ब्लड प्रेशर इत्यादि अशा रुग्णाना डॉ. पालीवाल हे स्वतः फोन द्वारे संपर्क साधून उपचार करत असत. अशा रुग्णाचे मानसीक धैर्य देण्याचे काम देखील डॉ. कोलगे व डॉ. पालीवाल यांनी केल्याचे नमूद केले.
नंतर जसजसे कोरोना रुग्ण वाढू लागले तसे डॉक्टरांनी प्रत्येक गृहसंकुलातून वैद्यकीय शिबिरे आयोजित केली. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन दोन्ही डॉक्टरांनी केले. ई पास मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजूंची वैद्यकीय तपासणी केली. असे हे दोन्ही डॉक्टर परिस्थितीच्या समोर जाऊन सतत लढत होते व लढत आहेत. अशा तऱ्हेने रुग्णाच्या सानिध्यात तपासणी करत असताना स्वतः व कुटुंबाच्या स्वास्थ्याबद्दल भिती वाटली नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. कोलगे म्हणाले त्यांनी तर एका वेळी चाळीस रुग्ण तपासले त्यातले 31 रुग्ण कोरोना पॉजीटिव होते हे समजल्यावर ते मनातून थोडे घाबरले पण त्याच क्षणी त्यांनी त्यांचे कर्तव्य आठवले व स्वतःची कोरोना टेस्ट केली व ती निगेटिव आल्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. तर रुग्ण तपासणी हे आमचे कर्तव्य असून आमच्या डॉक्टरी पेशाचा व ज्ञानाचा उपयोग आम्ही समाजासाठी व देशासाठी करणार असे डॉ. पालीवाल यांनी भावूक होऊन सांगितले. दोन्ही डॉक्टरांनी आपआपल्या कुटुंबाला समजावले आणि त्यांची त्यांना मोलाची साथ मिळत आहे.