ठाणे अनेक ठिकाणी जलमय

ठाणे अनेक ठिकाणी जलमय


ठाणे :


ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकळापासूनच जोरदार पाऊस कोसळला. मागील २४ तासांत जिल्ह्यात १२४.५६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर ठाणे शहर परिसरात संध्याकाळपर्यंत सर्वाधिक १२०.६८ मि.मी. पाऊस पडला. दिवसभरात ठाणे शहरात १२ ठिकाणी पाणी साचले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने घराबाहेरील जनजीवनावर या पावसाचा फारसा परिणाम जाणवला नाही.


सकाळी मानकोलीजवळ बस आणि कारचा अपघात झाल्याने मुंबई -नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. तर मुसळधार पावसामुळे ठाणे आणि कळवा स्थानकातील रूळ पाण्याखाली गेल्याने आपत्कालीन सेवांसाठी सुरू असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली होती.  जिल्ह्यात ठाण्यासह कल्याण-डोंबिवली आणि ग्रामीण भागात वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. एक-दोन ठिकाणी भिंतीही पडल्याच्या घटना घडल्या. हाजुरी येथील भींत कोसळल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. तीन पेट्रोल पंप जवळील  रेड क्रॉस रुग्णालय परिसरात पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image