विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्याना पोलीसांचा दणका



विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्याना पोलीसांचा दणका


नवी मुंबई


नवी मुंबई शहरात लॉकडाऊन झाल्यापासून सवलतींचा गैरफायदा घेऊन फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कंबर कसली आहे. परिसरात लॉकडाऊन दरम्यान नियमांचे उल्लंघन करून विनाकारण दुचाकी व चारचाकी घेऊन फिरणाऱ्या महाभागांना पोलीस प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. कलम 173 व 179 च्या अनुषंगाने कारवाई करून दंड वसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत लॉकडाऊन वाढवले आहे. मात्र, काही लोक लॉकडाऊनचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या महाभागांना धडा शिकवण्यात आला असून, त्यांच्या कडून दंड वसुली करण्यात आली आहे. नवी मुंबई कोरोनाग्रस्त रुग्णांचा वाढता आकडा पाहता कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोक लॉकडाऊन गंभीरपणे घेत नसल्याने कोपरखैरणे परिसरात ही कारवाई केली असल्याचे कोपर खैरणे पोलीस ठाण्याचे एपीआय सागर धुमाळ यांनी सांगितले.


 






 



 






 


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image