१७ लाखाची फसवणूक प्रकरणी एकास अटक
ठाणे
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील एका व्यक्तीकडून तब्बल १७ लाख रूपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सुमीत आहुजा नावाच्या व्यक्तीविरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाचपाखाडीत राहणा-या एका व्यक्तीची सुमीत आहुजा याने भारती एक्सा कंपनीच्या सर्व्हीस डिपार्टमेंट मधून बोलत असल्याचं भासवून फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. नौपाडा पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.
सुमीत आहुजा याने भारती एक्सा कंपनीतील पॉलिसीमध्ये दिशाभूल झाली असल्यानं भारती एक्सा एलाईट अॅडव्हान्टेज प्लानमध्ये पैसे भरा असा बनावट ई-मेल केला. तक्रारदाराने आयसीआयसीआय बँकेतून एनईएफटी आणि आयएमपीएस द्वारे भरलेले १७ लाख रूपये आहुजा याने भारती एक्सा कंपनीचे नावाने दिलेल्या बनावट खात्यामध्ये घेऊन ही रक्कम परस्पर काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं तक्रारदाराने नंतर पोलीसांत तक्रार दाखल केल्यानंतर आहुजा विरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.