कोव्हीड वॅार रूमला महापालिका आयुक्तांची भेट
रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना
ठाणे
कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करतानाच कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोवीड वाॅर रूमला आज महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी भेट देवून रूग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याबरोबरच आलेल्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले.
लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना कोवीडविषयी योग्य माहिती मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर 24 तास वॅार रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. या वॅाररूमध्ये 24 तास अधिकाऱी आणि डॅाक्टारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या वॅार रूमच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण करणे, तक्रारीच्या अनुषंगाने महापलिकेच्या संबंधित विभागाशी अथवा शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय ठेवणे, मंत्रालय कोव्हीड19 वॅार रूमशी समन्वय ठेवणे, कोरोना बाधित रूग्णांना आवश्यकता पडल्यास रूग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करणे, रूग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने समन्वय ठेवणे आदी कामे करण्यात येत आहेत.
कोवीड १९ वाॅर रूमची माहिती घेण्यासाठी आज दुपारी महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी वांर रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेचे ही वाॅर रूम इतरांसाठीही मार्गदर्शक ठरावी अशा पद्धतीने काम करावे अशा सूचना देतानाच रूग्णांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी वाॅर रूममधील डाॅक्टर्स आणि अधिकारी यांना दिल्या.
महापालिका भवनमधील तिसऱ्या मजल्यावर सुरू करण्यात आलेल्या या वॅार रूमध्ये तीन सत्रांमध्ये कार्यकारी अभियंता नितीन येसुगडे (भ्रमणध्वनी क्रमांक 8879600724), रामदास शिंदे (भ्रमणध्वनी क्रमांक 9769007799), सुधीर गायकवाड (भ्रमणध्वनी क्रमांक 9869737874) यांची कक्ष प्रमुख नियुक्ती करण्यात आली तर उप अभियंता महेश बोराडे (भ्रमणध्वनी क्रमांक 987009686), भगवान शिंदे (भ्रमणध्वनी क्रमांक 9892493287) आणि प्रशांत भूवड (भ्रमणध्वनी क्रमांक 9769600007) यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीनही सत्रांमध्ये डॅा. माधुरी देवल (भ्रमणध्वनी क्रमांक 9821277551), डॅा. भरत कुलथे (भ्रमणध्वनी क्रमांक 8329284399) आणि डॅा. आशिष सिंग (भ्रमणध्वनी क्रमांक 9930931986) या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित रूग्णांस त्यांच्या आजाराच्या अनुषंगाने उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देशमुख, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आदी उपस्थित होते