नपा व नगरपंचायत क्षेत्रात लॉकडाऊन १९ जुलैपर्यत
ठाणे
ठाणे जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात १९ जुलै रोजीपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव बघता लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
याआधी ठाणे मनपा तसेच नपा व नगरपंचायत हद्दीमध्ये लॉकडाऊन २ जुलै ते १२ जुलैपर्यंत जाहीर करण्यात आला होता. पण रोजची कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या बघता हा लॉकडाऊन वाढवण्यात आहे.अत्यावश्यक सेवा वगळता अटी आणि नियम हे मागच्या लॉकडाऊनप्रमाणेच कायम राहतील. महापालिका हद्दीमध्ये आयुक्त यांचे आदेश लागु राहतील.