मालमत्ता कर एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीचा पूर्णतः  माफ करण्याची भाजपची मागणी 


भाजपा प्रदेश सचिव, नगरसेवक संदीप लेले यांची आयुक्तांना निवेदन देऊन मागणी

ठाणे

ठाणे महापालिकेने एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करावा  तसेच पुढील परिस्थितीचा सापेक्ष विचार करुन मालमत्ताकराची आकारणी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव,नगरसेवक संदीप लेले यांनी केली आहे. लेले यांनी याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे  

२२ मार्च २०२० पासून देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणुन सर्व लहान मोठी अस्थापना, कार्यालये, व्यवसाय तसेच उद्योग हे गेले चार महिने पूर्णपणे ठप्प आहेत.२०२०.२१ या आर्थिक वर्षात आजतागायत अनेक व्यवसाय बंद आहेत व त्यांची कोणतीहीआर्थिक उलाढाल झालेली नाही, तसेच हि परिस्थिती अजुन किती काळ राहील याची कोणतीही शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. या अनुषंगाने या सर्वाना सरसकट मालमत्ता कर आकारणे योग्य होणार नाही. २०१९-२० या आर्थिक वर्षात व्यवसाय चालू असल्यामुळे प्रत्येक घटकाने आपला मालमत्ता कर भरलेला आहे.तरी वरील सर्व बाबींचा विचार करुन एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीचा मालमत्ता कर पुर्णपणे माफ करण्यात यावा तसेच पुढील परिस्थितीचा सापेक्ष विचार करुन मालमत्ताकराची आकारणी करण्यात यावी अशी मागणी  भाजपा प्रदेश सचिव, नगरसेवक संदीप लेले यांनी निवेदनाद्वारे ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

 

 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image