बाल विद्या मंदिर व आदर्श इंग्रजी स्कूल, ठाणेच्या विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश 
बाल विद्या मंदिर व आदर्श इंग्रजी स्कूल, ठाणेच्या विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश 

 

ठाणे

 

आदर्श विकास मंडळ संचालित बाल विद्या मंदिर व आदर्श इंगिलश स्कूल, ठाणे या दोन्ही शाळांमधील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी उच्च गुण संपादन करून शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये 100 टक्के निकाल राखत शाळांच्या नावलौकिकास वृद्धींगत केले आहे. 

बाल विद्या मंदिरमधील पहिले पाच क्रमांक पटकावणाऱया गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे - प्रथम - प्रेरणा पोखरकर - 94.80 टक्के; द्वितीय - दिव्या दळवी - 94.40 टक्के; तृतीय - साक्षी जाधव - 94.20 टक्के; चतुर्थ - अविर इंगळे - 93.80 टक्के आणि पाचवा - वैष्णवी शेवाळे - 92.80 टक्के. त्याचप्रमाणे आदर्श इंग्लिश स्कूलमधील पहिले पाच क्रमांक पटकावणाऱया गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे - प्रथम - रोशनी कोरी - 87.40 टक्के; द्वितीय - आरती कुमावत - 84.60 टक्के; तृतीय - साहिल पडते - 83.40 टक्के; चतुर्थ - वासुदेव नारकर - 81.00 टक्के आणि पाचवा - कोमल कुमावत - 77.40 टक्के, सानिका जागडे - 77.40 टक्के आणि स्नेहा शेवडे - 77.40 टक्के. 

बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका विमल बा. गोळे, आदर्श इंगिलश स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुषा मि. बल्लाळ तसेच आदर्श विकास मंडळचे अध्यक्ष सचिन बी. मोरे, सचिव संतोष शिंदे तथा अन्य पदाधिकाऱयांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्याथ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे. 

 


आनंद विश्व गुरुकुलचा शालांत परीक्षेचा निकाल 100 टक्के 

 

आनंद विश्व गुरुकुल या शाळेचा शालांत परीक्षेचा(एस.एस.सी.) निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतून शैक्षणिक वर्ष - 2019-20 यावर्षी एस.एस.सी. परीक्षेस बसलेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमधून रोनित पालन - प्रथम क्रमांक - 93.40 टक्के; श्वेता जोशी - द्वितीय क्रमांक - 92.40 टक्के आणि सोहम परब - तृतीय क्रमांक - 91.80 टक्के या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकांचा बहुमान प्राप्त झाला आहे. समाजातील सर्व स्तरांतून या गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.