कोवीड 19 चाचणीसाठी डॅाक्टरांच्या शिफारशीची आवश्यकता नाही
महापालिका आयुक्तांचे निर्देश
ठाणे
कोवीड 19 चाचणीसाठी आता डॅाक्टरांच्या शिफारशीची गरज नसल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले असून तशा आशयाचे निर्देश महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आरोग्य विभागाला दिल आहेत. यापूर्वी डॅाक्टरांच्या किंवा महापालिकेच्या फिव्हर ओपीडीमधील डॅाक्टरांच्या शिफारशींशिवाय कोवीड 19 ची चाचणी करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. परंतू संशयित रूग्णांची योग्यवेळी चाचणी करून त्यांना वेळीच अलगीकरण केले तर कोरोना कोवीडचा प्रादूर्भाव रोखण्यास मदत होणार असल्याने महापालिकेच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी जनरल प्रक्टीशनर्श यांनाही कोवीड 19 चाचणीची शिफारस करण्यासाठी प्रतिबंधित कण्यात आले होते. तथापि त्यांच्याकडे येणाऱ्या संशयित रूग्णांना ते कोवीड 19 च्या चाचणीसाठी शिफारस करण्याची मुभा देण्यात आली आहे.