कोवीड 19 अ‍ॅटीजन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते उद्घाटन

कोवीड 19 अ‍ॅटीजन टेस्टींग सेंटरचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते उद्घाटन


अर्ध्या तासात मिळणार चाचणीचा अहवाल - चार ठिकाणी सेंटर्स कार्यान्वित



ठाणे


ठाणे महानगरपालिकेच्यावतीने कोवीड 19 रॅपिड ॲंटीजन किटसच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या टेस्टींग सेंटरचे उद्घाटन आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय कळवा येथे पार पडले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्याचे प्रमाण वाढविण्यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने महापालिकेने जवळपास 1 लाख कोवीड 19 रॅपिड अँटीजन किटस मागविले आहेत. या किटसच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ 30 मिनिटात चाचणीचे निकाल प्राप्त होत असल्याने योग्यवेळी कोवीड संशयित व्यक्तींस गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.


      सद्स्थितीमध्ये ठाणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय, सी. आर. वाडिया हॅास्पीटल, कोरस आरोग्य केंद्र आणि घोडबंदर रोडवर रोझा गार्डनिया येथील आरोग्य केंद्र या चार ठिकाणी ही चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून या ठिकाणी तात्रिक आणि इतर सर्व प्रकारचे मुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  प्रामुख्याने शहरातील हॅाटस्पॅाटस, प्रतिबंधित क्षेत्रे, झोपडपट्टी आणि दाटीवाटीची वस्ती असलेल्या प्रभागातील कोवीड संशयित रूग्णांची चाचणी या रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image