पत्रकारांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळावी

पत्रकारांनाही लोकलमधून प्रवासाची परवानगी मिळावी


मुंबई


दिनांक १५ जून २०२० पासून फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू झाली. सकाळी ५.३० ते रात्री ११.३० साधारण दर १५ मिनिटांनी एक गाडी  विरार ते चर्चगेट - ६५ अप आणि ६५ डाऊन अश्या एकूण १३० गाड्या धावतील.
डहाणू-विरार - ८ अप आणि ८ डाऊन अश्या एकूण १६ गाड्या धावतील.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा/कर्जत/कल्याण/ठाणे ६५ अप आणि ६५ डाऊन अश्या १३० ट्रेन धावतील.- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल ३५ अप आणि ३५ डाऊन अश्या एकूण ७० गाड्या धावतील.  


यामध्ये Journey Ticket/Season Ticket shall be issued to Essential Services staff on production of Identity Card issued by  1.Municipal Corporation of Greater Mumbai.  2. Thane Municipal Corporation  3. Vasai Virar Municipal Corporation  4. Palghar Municipal Corporation  5. Kalyan Dombivali Municipal Corporation  6. Mira Bhayander Municipal Corporation  7. Navi Mumbai Municipal Corporation  8. Maharashtra Police
9. BEST  10. Mantralaya  11. All Government/Private Hospital for their staff.  12. MSEB Staff  All State n Central Govt. employees यांनाच प्रवास करता येणार आहे. मात्र सरकारने यामधून पत्रकारांना वगळले आहे. 


कोऱोना महामारीमध्येही  स्वतः च्या  जीवाची  पर्वा  न  करता पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहेत, घरच्यांचा विरोध पत्करून आपले  कर्तव्य  बजावण्याकरिता  घराबाहेर  पडतात, जसे  पोलीस , डॉक्टर, नर्सेस  व  मनपाचे  आरोग्य  खात्यातील  कर्मचारी  कोऱोना  योद्धा  आहेत, तसेच  पत्रकारही  कोऱोना  योद्धा  आहेत, त्यांना  महाराष्ट्र  राज्य  सरकारने  रेल्वे  लोकलने प्रवास करण्यास  परवानगी द्यावी  अशी  कोकण  विभाग  पत्रकार  संघातर्फे  विनंती  करीत  आहे, सर्व  मुबई  व   ठाणे  जिल्ह्यातील  पत्रकार  संघटनांचे  अध्यक्षांनी  आपल्या  लेटरहेडवर  पत्रकाराना  रेल्वे  लोकलने  प्रवास  करण्याची  परवानगी  मिळावी, याकरिता  महाराष्ट्राचे  मुख्य मंत्री , परिवहनमंत्री , नगरविकास  मंत्री  व  मुंबई ,,,,, ठाण्याचे  पालकमंत्री   याना  अर्ज  पाठवावेत  असे आवाहनही करण्यात येत आहे.