वडाच्या झाडाच्या फोटोचे  पूजन करून महिलांनी दिला वृक्ष संवर्धनचा संदेश

 वडाच्या झाडाच्या फोटोचे  पूजन करून महिलांनी दिला वृक्ष संवर्धनचा संदेश

नगरसेविका परीषा सरनाईक यांच्या आव्हानाला महिलांचा उदंड प्रतिसाद

ठाणे


यंदा कोरोनाचे संकट असून घरातच महिलांना वटपौर्णिमा साजरी करावी लागणार असल्याने मोठ्या प्रमाणात वडाच्या झाडाच्या फांद्यांची तोड होणार हि बाबा लक्षात  नगरसेविका परीषा सरनाईक यांनी होणारी हि वृक्ष तोड रोखण्यासाठी विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नागरिकांना घरोघरी वडाच्या झाडाचे फोटो वाटप करत महिलांनी वडाच्या फांद्या तोडून यांची पूजा न करता पर्यावरणाला प्राधान्य द्यावे व घरातच वडाच्या झाडाचे पूजन करून हा सण साजरा करावा असे आव्हान केले होते.परीषा सरनाईक यांच्या या आव्हानाला महिलांनी उदंड प्रतिसाद देत घरातच मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला.


वृक्षांची तोड रोखण्यासाठी नगरसेविका परीषा सरनाईक यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे. कोरोनाच्या सावटामुळे वटपौर्णिमा महिलांना घरात साजरी करावी लागत असली तरी या दिवशी महिलांनी  हा सण साजरा करावा याकरिता नगरसेविका परीषा सरनाईक यांनी "नथीचा नखरा" या शीर्षकांतर्गत  वटसावित्रींसाठी आगळीवेगळी स्पर्धाही आयोजित केली आहे. यामध्ये पैठणी, नथ यासह विविध आभुषणे घालून नटणाऱ्या वटसावित्रींनी वडाच्या झाडाच्या फोटोसह आपला फोटो पाठवण्याचे आव्हान केले होते याला देखील महिलांनी प्रतिसाद देत आपले फोटो परीशा सरनाईक यांना पाठवले आहेत या फोटोच्या स्पर्धेमध्ये  विजेत्या वटसावित्रींला प्रथम पारितोषिक नथ, द्वीतीय पारितोषिक पैठणी आणि तिसरे पारितोषिक पैंजण देण्यात येणार आहे.