तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कारासाठी अर्ज

२० जून पर्यंत तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कार व राष्ट्रिय युवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत


ठाणे


केंद्र शासनाच्या युआ कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी “ तेनझिंग नोर्गे ” राष्ट्रिय साहसी पुरस्कार सन २०१९ व राष्ट्रिय युवा पुरस्कार २०१७-१८ आणि २०१८-१९ साठी नामांकने सादर करण्याबाबत कळविले आहे. तेनझिंग नोर्गे राष्ट्रिय साहसी पुरस्कार हा देशातील भूमी, समूद्र, आणि हवेच्या साहसी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या साहसी खेळाडू यांना व राष्ट्रिय युवा पुरस्कार राष्ट्रिय विकास आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या युवांना देण्यात येतो. सदरच्या पुरस्कारा बाबतची नियमावली www.yas.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.


                केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. २० जून २०२० पर्यंत क्रीडा संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- ०२२-२५३६८७५५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे स्नेहल साळूंखे यांनी केले आहे.


 



Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image