भरधाव वाहनाची झाडाला धडक एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

भरधाव वाहनाची झाडाला धडक एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी


ठाणे : 


घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी परिसरात शनिवारी रात्री भरधाव वाहनाची झाडाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त वाहनात मद्याच्या बाटल्यावरील कागदी आवरण सापडले असून याबाबतचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


शनिवारी रात्री आठच्या सुमारास एक कार आरडीएमसी-टीएमसी: टोयोटा फॉर्च्युनर कार एमएच 43 एएन 1812  घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येत होती. कापूरबावडी सिग्नलजवळ ती पदपथालगतच्या चार झाडांना घासून पाचव्या झाडावर आदळली. यात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीररीत्या जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे. दोघा जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या चौघांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. विहंग हॉटेल, कापूरबावडी, ठाणे (प). कापूरबावडी पोलिस अधिकारी अधिक तपास करीत आहेत.



 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image