पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु

पावसाळी पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागु

ठाणे 


ठाणे जिल्हयातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठया प्रमाणात येतात. अशा ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होवून प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासर्व ठिकाणी  प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

ठाणे जिल्हयामध्ये मान्सुन कालावधीत मोठया संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसेच धरणांच्या ठिकाणी येत असतात त्या ठिकाणी जिवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत.
 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन ठाणे जिल्हयातील तालुका निहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला  आहे.

येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा मुंब्रा रेतीबंदर सिध्दगड डोंगरनाव्हे, सोनाळे गणपती लेणी, हरिश्चंद्रगड,बारवीधरण परिसर भातसा धरण स्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा. मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे, गायमुख रेतीबंदर पडाळे डॅम, माळशेत घाटातील सर्व धबधबे, पळु चेरवली, अशोक धबधबा, खरोड, आजा पर्वत (डोळखांब), सापगांव नदी किनारी, कळंबे नदी किनारा, घोडबंदर रेतीबंदर, उत्तन सागरी किनारा खोपवली, गोरखगड, सिंगापुर नानेघाट, धसई डॅम, आंबेटेबे मुरबाड कसारा येथील सर्व धबधबे,कांबा पावशेपाडा, खडवली नदी परिसर, टिटवाळा नदी परिसर, गणेश घाट चौपाटी नदीनाका, गणेशपुरी नदी परिसर कोंडेश्वर, धामणवाडी, तारवाडी, भोज, वऱ्हाडे, दहिवली, मळीचीवाडी यांचा समावेश आहे.  


 



Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image