निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे  जिल्ह्यात जिवितहानी नाही
निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे  जिल्ह्यात जिवितहानी नाही

 


 

ठाणे 

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे ठाणे  जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे व कच्ची घरे  पडण्याचे  प्रकार घडले.मात्र  जिल्ह्यात जिवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हाप्रशासनाने दिली. ठाणे जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाय म्हणून  मिरा भाईदर महानगरपालिका ७००,कल्याण ग्रामीण ३६१,शहापूर (१९ गावे) १०६७,नवी मुंबई मनपा ४६२,कल्याण डोंबिवली मनपा ५०० अशा एकूण ३०९०  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते.ठाणे जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे उल्हासनगर नगर मध्ये ११,भिवंडी 2 मुरबाड १४ शहापूर मध्ये ३,अंबरनाथ ३,एकूण ३३ घराचे नुकसान झाले आहे. तसेच ठाणे मध्ये ५३,कल्याण  ५०,भिवंडी ११ मिरा भाईदर ११,उल्हासनगर ३८,अंबरनाथ १५,कुलगाव बदलापूर १४ एकुण १९२ झाडे पडली आहेत. व उल्हासनगर मध्ये १ विज खांब पडला आहे. कल्याण मध्ये 3 बकरी मयत झाले आहेत.

(3 जुन २०२०: सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार)







 







Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image