कोरोनाविषयी ठाणे पोलीसांची जनजागृती

कोरोनाविषयी ठाणे पोलीसांची जनजागृती


ठाणे


 कोरोनाविषाणूच्या विरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे पोलीस व गोदरेज प्रॉपर्टीज यांनी एकत्र येत 'हमारा संकल्प' हा उपक्रम हाती घेतला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे असून नागरिकांमध्ये सजगता आणि जागृती करण्याच्या उद्देशाने त्यांनी 'हमारा संकल्प' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कोरोनाच्या या युद्धजन्य परिस्थितीत कशापद्धतीने सजग रहावे याविषयीची माहिती या चित्रपटातून देण्यात आली आहे.


टाळेबंदी हटली म्हणजे कोरोना सोबतचे युद्ध संपले असे होत नाही याची जनजागृती या चित्रपटाच्या माध्यमातून केली जाणार आहे. आपल्याला शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन टाळेबंदी संपल्यानंतरही करावे लागणार असल्याचा संदेश या चित्रपटाद्वारे देण्यात आला आहे. ठाणे पोलीस सदैव दक्ष असतात, नागरिकांनी देखील सदैव दक्ष असावे तसेच स्वतःसह कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सर्व खबरदारी घ्यावी अशी पोलिसांची अपेक्षा आहे.


पोलीस आयुक्त, श्री. विवेक फणसाळकर म्हणाले, "कोरोना विरोधातील युद्ध हे सुरूच राहणार आहे. नागरिकांना स्वतः सोबत दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी देखील जबाबदार होणे गरजेचे आहे. मास्क घालणे, शारीरिक अंतर पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे व संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे".


 



 


 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image