बेतावडे येथील अलगीकरण कक्षास स्थानिक नागरिकांचा विरोध
ठाणे
महापालिकेतर्फ़े दिवा-मानपाडा रोडवरील रूनवॉल माय सिटी इमारतीत उभारण्यात येणाऱ्या विलगिकरण केंद्राला नागरिकांचा विरोध आहे. याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज केला तर काही काही जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
बेतावडे येथील रुनवाल गार्डन गृहसंकुलात उभारल्या जाणाऱ्या अलगीकरण कक्षास तेथील १५० पेक्षा अधिक कुटुंबांनी विरोध केला. तसेच येथील रहिवाशांनी प्रवेशद्वार बंद करून प्रशासनाला आणि पोलिसांना आत येण्यास रोखले. त्यानंतर दिव्यातील स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी त्यांच्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले. दरम्यान प्रशासन, पोलिस आणि स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवी यांनी या गृहसंकुलाचे प्रवेशद्वार तोडून गृहसंकुलात प्रवेश केला. त्याचबरोबर तेथील विरोध करणाºया रहिवाशांना नगरसेवकाच्या काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचेही येथील रहिवाशांकडून सांगण्यात आले. तसेच विरोध करणाºया आठ ते दहा रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.