कोरोंटाईन सेंटरवर पिण्याचे गरम पाण्याची सोय उपलब्ध करा

 


भाईंदरपाडा येथील ठामपा कोरोंटाईन सेंटर वर कोरोंटाईन केलेल्या लोकांना पिण्याचे गरम पाण्याची सोय करून द्या


ठाणे


भाईंदरपाडा येथे ठाणे महापालिका प्रशासनाने लोढा काॅम्पलेक्स येथे कोरोना संशयीत लोकांना कोरोंटाईन करण्यासाठी सुरू असलेल्या कोरोंटाईन सेंटरवर अद्यापही पिण्याचे गरम पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. सदर बाबत मा. महापौर नरेश म्हस्के यांना फोनवर  विनंती करण्यात आली आहे. त्यांनी पिण्याचे गरम पाण्याची सोय करणे बाबत प्रशासनास सूचना केली असल्याचे सांगितले आहे. पिण्याचे गरम पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही आरोग्य रक्षणासाठी आवश्यक बाब असून आपण तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती जगदीश खैरालिया, 
सेक्रेटरी- श्रमिक जनता संघ यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत कायमस्वरूपी व्यवस्था होत नाही तोपर्यंत जेवणाची सोय करणारे ठेकेदारांकडून सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गरम पाणी पुरवण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत.