ठाणे परिवहन सेवा  शहराबाहेरील मार्गावर नाही

ठाणे परिवहन सेवा  शहराबाहेरील मार्गावर नाही


ठाणे : 


ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने शहरातील बेस्ट बसच्या थांब्यांपर्यंतच बससेवा सुरू केली असून शहराबाहेरील सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नोकरदारवर्गाचे हालच होत आहेत.  बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा आणि भिवंडी या शहराबाहेरील मार्गावर अद्याप बससेवा सुरू केली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून या मार्गावरही बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. टप्प्याटप्प्याने बसगाडय़ांचे नियोजन सुरू असल्याने या मार्गावरही लवकरच बससेवा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.


ठाणे स्थानक परिसर हा टीएमटीचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. रेल्वे बंद असल्यामुळे कोणत्या मार्गावर टीएमटी बस चालवायच्या असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. अखेर शहरातील तीन हात नाका तसेच इतर बेस्ट बसच्या थांब्यांपर्यंत अंतर्गत बस वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३५ बसगाडय़ांची शहरातंर्गत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा आणि भिवंडी या शहराबाहेरील मार्गावर अद्याप बससेवा सुरू नाही. बोरिवली, मीरा रोड, नालासोपारा, भिवंडी या मार्गावर दररोज प्रत्येकी दहा बसगाडय़ांमधून ४० फेऱ्या होतात, तर बोरिवली मार्गावर २५ वातानुकूलित बसगाडय़ांच्या १०० फेऱ्या होतात. या सर्वच मार्गावरून टीएमटीला दररोज पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. सध्या या मार्गावर बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. तसेच या मार्गावर बससेवा सुरू झाली तरी त्या ठिकाणी वातानुकूलित बस चालविता येणार नाहीत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.



 

Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image