शिधावाटप संदर्भांतअडचणी असल्यास उप नियंत्रक शिधावाटप यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन
ठाणे
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये जनतेची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने जाहिर केलेल्या विविध योजनाच्या माध्यमातुन सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत शिधावस्तूचे वितरण करणे सुरु आहे.
मंबई ठाणे शिधावाटप क्षेत्रातील फ परिमंडळ ठाणे अंतर्गत सद्यस्थितीमध्ये 7,45,618 शिधापत्रिकांची ऑनलाईन नोंद असून त्यावरील व्यक्ती संख्या 32,27893 अशी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती (प्राधान्य कुटुंब ) 5 किलो धान्य दिले जात आहे. त्यामध्ये 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ असे दिले जाते. तसेच अंत्योदय कार्डधारकांना 35 किलो धान्य दिल्या जाते. धान्याचा दर 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदुळ याप्रमाणे आहे. या व्यतिरिक्त माहे एप्रिल ते जून या तीन महिन्यासाठी याच कार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो प्रमाणे मोफत तांदुळ व 1 किलो मोफत डाळ प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत वाटप करण्याचे आदेश प्राप्त झाले होते.
1 एप्रिल २०२० पासून ते आजपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्य्याना 3,70,792क्विटल धान्याचे वाटप करण्यात आलेले आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत 2,78,184 क्विटल धान्याचे व 6,627 क्विटल डाळीचे या लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आलेले आहे.या व्यतिरिक्त अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या केशरी शिधापत्रिका धारकांना 33,785 क्चिटल धान्याचे वाटप प्रतिकिलो तांदुळ 12 रुपये व गहू 8 रुपये या दराने करण्यात आले आहे.आत्मनिर्भर भारत पॅकेज़ अंतर्गत विस्थापित/स्थलांतरित मजूर तसेच बिगरशिधापत्रिकाधारकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्याचे व 1 किलो अख्खाचना मोफत देण्यासंबंधी 19 मे 2020 च्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्यानुसार फ परिमंडळात आज पर्यंत 23 हजार 792 व्यक्तीना 1978.75 क्विटल वाटप करण्यात आलेले आहे.राज्यशासनाच्या शिवभोजन योजनेअंतर्गत 1 एप्रिल पासुन 17 जुन पर्यंत 3,05,124 गरीब व गरजू लाभाथ्यांना शिवभोजन थाळीचा लाभ प्रतिथाळी 5 रुपये या दराने देण्यात आलेला आहे.
परिमंडळ कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत कोणत्याही अडचणी असल्यास ०२२-२५३३२६५७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टसिंगचे पालन करुन शिधाजिन्नस घ्यावे असे उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ,ठाणे कार्यालयाकडून आवाहन करण्यात आहे.