मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयाचा निधी
ठाणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिक्षक नेते स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या ठाणे शाखेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयाचा निधी दिला आहे. ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सभासद, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी ही मदत दिली आहे. संपुर्ण जगावर आज कोरोनाचे संकट आलेले आहे. महाराष्ट्र सुद्धा या वैश्विक महामारीचा कठीण सामना करत असल्याने या कठीण परिस्थितीत महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदतीची गरज असल्याने ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने महाराष्ट्र शासनास मदतीचा हात म्हणून एक लाख रुपयांची मदत केली आहे.
शनिवारी मुरबाड पंचायत समिती उपसभापती अनिल देसले व जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या रेखा कंटे, जेष्ठ नेते रामभाऊ दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा संघाचे नेते जयवंत मुरबाडे, जिल्हाध्यक्ष भगवान भगत, जिल्हा सरचिटणीस वसंत पडवळ, पतपेढी संचालक राजेंद्र सापळे, पदवीधर जिल्हाध्यक्ष गणेश रिकामे आदींनी ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. यावेळी गव्हर्नमेंट सर्व्हंट्स पतपेढी संचालिका कांचन चौधरी, रंजना डोहळे, शुभांगी पवार, विकास भोईर, रविंद्र घरत, दिपक पाटोळे, तानाजी जाधव, रघुनाथ ईसामे, अशोक सोनावणे, सोमनाथ सुरोशे, काशिनाथ राऊत, हनुमंत मोहपे, सुनिल देशमुख, भरत भांडे, सोपान गोल्हे, रविंद्र मोहपे, शैलेश ईसामे, संतोष डोंगरे आदी उपस्थित होते.