लघू उद्योगाना महावितरणचा शॉक

लघू उद्योगाना महावितरणचा शॉक


ठाणे :


लॉकडाऊननंतर तीन महिन्यांनंतर शहराची परिस्थिती काहीशी पुर्वपदावर येत आहे. छोटे छोटे उद्योगधंदे सुरु करण्याच्या तयारीत आहेत.मात्र अशातच लॉकडाऊन कालावधीत बंद असलेल्या कंपन्यांना बेशुमार बीले पाठवल्याने कंबरडे मोडले आहे. २१ मार्चनंतर जूनमध्ये ५० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. तेथे २० टक्केच काम होत आहे. मात्र, त्यांना लागणारा कच्चा मालही मिळत नाही आणि बाजारातून मागणीही नाही. त्यामुळे उद्योजकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. 


 महावितरणनेही या उद्योगांना सरासरी बिल पाठवून मोठा शॉकच दिला आहे. तीन महिन्यांत वीजवापरच झालेला नसताना महावितरणने सरासरी २० ते २५ लाखांचे बिल पाठवले आहे. ही भरमसाट बिले भरायची कशी, असा सवाल उद्योजक करत आहेत. एमआयडीसीनेही उद्योगांना पाण्याची सरासरी बिले लाखांत पाठविल्याने तोंडचे पाणी पळाले आहे.