कोव्हीड केअर सेंटर उभारणे सोसायटींसाठी बंधनकारक नाही

कोव्हीड केअर सेंटर उभारणे सोसायटींसाठी बंधनकारक नाही
सोसायट्यांकडून प्रस्ताव आल्यामुळेच हा निर्णय घेतला
महापालिका प्रशासनाचा खुलासा
 
ठाणे 


गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारण्यासाठी काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांकडूनच प्रस्ताव आल्यामुळे आपण सोसायटीच्या क्लब हाऊस, म्ल्टीपर्पज हॅालमध्ये कोव्हीड केअर सेंटर निर्माण करण्याविषयीचा निर्णय घेतला होता. तथापि हा निर्णय बंधनकारक नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
      कोरोना कोव्हीड 19 ची सौम्य लक्षणे असलेल्या आणि कसलाही त्रास नसलेल्या रूग्णांना आता महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची आवश्कता नसून अशी सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांना सोसायट्यांमध्ये उपलब्ध असलेल्या क्लब हाऊसमध्ये क्लारंटाईन करण्याचा आणि त्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला होता.      याबाबत काही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव महापालिकेस सादर केला होता. त्यानुषंगाने हा निर्णय घेण्यात आला होता. तथापि हा निर्णय गृहनिर्माण सोसायट्यांसाठी बंधनकारक नसल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.