माजीवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १००० बेड क्षमतेचे तात्पुरते रुग्णालय


माजीवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १००० बेड क्षमतेचे तात्पुरते रुग्णालय



ठाणे:


ठाण्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयीन क्षमता वाढवण्यात येत असून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका माजीवडा येथील ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १००० बेड क्षमतेचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येत आहे.


या रुग्णालायचे काम अंतिम टप्प्यात असून आज, शनिवारी श्री. शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. एमएमआरडीए आणि एमसीएचआय यांच्या सहकार्याने या रुग्णालयाची उभारणी करण्यात येत असून या कोविड सेंटरमध्ये ५०० ऑक्सिजन व ५०० नॉन ऑक्सिजन बेड्स , डायलिसिस सेंटर तसेच ८० आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून हे कोविड सेंटर ठाणेकर जनतेच्या सेवेत रुजू करण्याचे निर्देश निर्देश याप्रसंगी श्री . शिंदे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.