सरकारने कारवाई केल्यास सहकुटुंब जेलभरो आंदोलन

सरकारने कारवाई केल्यास सहकुटुंब जेलभरो आंदोलन


मुंबई


राज्य सरकारतर्फे विविध क्षेत्रातील दुकांनाना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र, सलून चालकांना अद्याप व्यवसाय सुरू करण्याबाबत परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे दहा जूनपर्यंत सलून व्यवसायास अटींसह परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे करण्यात आली आहे.  परवानगी न मिळाल्यास १० जून रोजी राज्यभर सलून व्यावसायिक फलक लावून निषेध करतील. त्यानंतरही सरकारला जाग न आल्यास १५ जून रोजी राज्यभरातील सलून सुरू करू आणि सरकारने कारवाई केल्यास सहकुटुंब जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सलून आणि ब्युटीपार्लर संघटनांनी दिला आहे. येत्या काळात परवानगी न दिल्यास पोटापाण्यासाठी सलून सुरू करू आणि कारवाई झाल्यास कुटुंबासह जेलमध्ये जाण्यास तयार राहू, अशी प्रतिक्रिया एका सलून मालकाने दिली.




 


 

Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image