शनिवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद

शनिवारी शहरातील काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद


ठाणे 


ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळ्यापूर्वी सबस्टेशनमधील कामे करणे, ट्रान्सफार्मरचे ऑईल फिल्टेशन करणे, ठाणे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर असलेली क्रॉस कनेक्शनवर होत असलेली गळती थांबविणे तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रात मुख्य जलवाहिनीवर असलेल्या झिरोवेलासिटी वॉलमधून होणारी गळती थांबविणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. ही कामे करण्यासाठी शनिवार दि. 06/06/2020 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दि. 07/06/2020 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.


परिणामी घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, गांधीनगर, जॉन्सन, इटरनिटी, समतानगर, ऋतूपार्क,सिध्देश्‌वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर, कळव्याचा काही भाग आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.            वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महानगरपालिका यांनी केले आहे.