कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एपीएमसी तात्काळ बंद करा - आमदार गणेश नाईक 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एपीएमसी तात्काळ बंद करा - आमदार गणेश नाईक 
बाजार आवारातील घटकांना लागण, नवी मुंबईत फैलाव



नवी मुंबई 


एपीएमसी बाजार आवारातील अनेक घटकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून यामुळे नवी मुंबई शहरात या रोगाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने एपीएमसी तात्काळ बंद करावी,
अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. 
आमदार नाईक यांनी देशाचे पंतप्रधान ,राज्याचे मुख्यमंत्री ,पणन मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते ,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ,कोकण विभागीय आयुक्त ,ठाण्याचे जिल्हाधिकारी यांना 7 मे 2020 रोजी पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. रुग्णांचा आकडा 484 च्या पलीकडे गेला आहे. एकूण रुग्ण संख्या पैकी शंभरपेक्षा अधिक बाधित झालेल्या व्यक्ती या एपीएमसी मधील व्यापारी, माथाडी ,मापाडी, अधिकारी-कर्मचारी आहेत किंवा  त्यांच्यामुळे बाधित झालेल्या त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील इतर व्यक्ती आहेत. अनेकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. एपीएमसीमध्ये दररोज दुपटीने मालाची आवक होते सहाजिकच त्यामुळे गर्दीही होते. सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. एपीएमसीमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे बाजार आवारात भीतीचे वातावरण आहे. ही भीती येथील घटकांच्या मनामध्ये एवढी बसली आहे की काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बाजार समिती व्यवस्थापनाकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेले आहेत. आपल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आणि समाजातील इतर व्यक्तींच्या जीवाशी खेळ नको अशी भूमिका येथील घटकांनी घेतली आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून एपीएमसी मधील घटकांचे कोरोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी त्याच बरोबर बाजार आवारातील संसर्गाचा नवी मुंबई शहरात इतरत्र फैलाव रोखण्यासाठी परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत एपीएमसी तात्काळ बंद करावी असे आमदार गणेश नाईक यांनी आपल्या मागणी पत्रात नमूद केले आहे.


Popular posts
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ड्रग्जप्रकरणी नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीचं समन्स
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image