महागिरीत सुधीर कोकाटे यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर
ठाणे
नगरसेवक श्री.सुधीरजी कोकाटे व महागिरी शिवसेना शाखायांच्या संयुक्त विद्यमाने MCHI च्या तज्ञ डॉक्टरान कडून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून सर्दी,खोकला, ताप व इतर आजारांवर मोफ़त औषध उपचार करण्यात आले . या शिबिराचा महागिरीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शिबिराला नगरसेवक सुधीर कोकाटे, उप महापौर सौ.पल्लवी कदम, उप विभागप्रमुख अनिल घोलप, विजय पवार, इंटक ठाणे अध्यक्ष सचिन शिंदे, ब्लॉक अध्यक्ष इदायत मुकादम, उपशाखाप्रमुख अनिल कोळी, नवनीत पाटिल जेष्ठ समाजसेवक सुरेंद्र भोई, मा.नगरसेवक पवन कदम आदींनी भेट दिली. *शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख सचिन चव्हाण यांच्याबरोबर उप विभागप्रमूख विजय पवार, उपशाखाप्रमुख अजय पवार, हुसेन पिंजारी, गटप्रमुख नितीन चौधरी, प्रवीण नाईक, तसेच विभागातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली .