ठामपाने केला एक हजारांचा टप्पा पार 

ठामपाने केला एक हजारांचा टप्पा पार 



ठाणे 


शनिवार १६ मे रोजी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 289 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 432 झाली आहे. तर  5 जण दगावले आहेत. सर्वात जास्त 94 रुग्ण हे ठाणे महापालिका हद्दीत नोंदवल्याने ठामपाने नवीमुंबई पाठोपाठ एक हजारांचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर मिराभाईंदरने तिनशेचा आणि उल्हासनगरने शंभराचा आकडा गाठला आहे. तर नवीमुंबई 80 रुग्ण मिळून आले असून तेथे तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सर्वात कमी एका रुग्णाची नोंद ही अंबरनाथ येथे झाली आहे.


कल्याण डोंबिवलीत 35 नवे रुग्णांची नोंद झाल्याने रुग्ण संख्या 459 वर गेली आहे. तसेच एकाचा मृत्यू ही झाल्याने मृतांचा आकडा 10 झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 24 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्ण 165 झाली आहे. 21 नवे रुग्ण हे मिराभाईंदर येथे आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या 312 झाली असून तेथे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 9 झाला आहे. बदलापूरला 19 रुग्ण मिळून आल्याने रुग्ण संख्या 98 वर गेली आहे. उल्हासनगर येथे 12 नवे रुग्ण निदान झाल्याने रुग्ण संख्या 106 इतकी झाली आहे. भिवंडीत 5 जण सापडल्याने तेथील रुग्ण संख्या 41 झाली आहे. सर्वात कमी 1रुग्ण हा अंबरनाथमध्ये मिळाल्याने तेथील रुग्ण 33 झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.