गोकुळनगर परिसरातील ३००० कुटुंबाना  जीवनाश्यक वस्तूंचे वाटप  

गोकुळनगर परिसरातील ३००० कुटुंबाना  जीवनाश्यक वस्तूंचे वाटप  



ठाणे


कोरोनामुळे गेले २ महिने लॉकडाऊन आहे, यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहे. अशा ठाणे शहरातील गरजू नागरिकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात दिला असून त्यांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप  करण्यात येत आहेत. अशाच ठाण्यातील गोकुळनगर, जरीमरी परीसर,  मिलिंद नगर, हरदास नगर, रियाज चाळ, आझाद नगर २,भवानी नगर,अचानक नगर, भैयासाहेब आंबेडकर नगर, आदि भागातील तीन हजार गरजू कुटुंबाना नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने  तसेच ठाणे जिल्हाप्रमुख महापौर नरेश म्हस्के, उपशहरप्रमुख जगदीश थोरात व विधानसभा क्षेत्र संघटक हेमंत पवार यांच्या प्रयत्नाने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपशहर प्रमुख जगदीश थोरात ,शाखाप्रमुख देवानंद पाटील, शाखाप्रमुख सतीश पवार, उपविभाग प्रमुख वैभव साबंकर, संतोष पाटील, नंदा कोथले, उपशाखाप्रमुख मोहन कदम, गणेश पाडळे, नीलेश सोनवणे, सदा चिमूलगी, दिनेश चिमूलगी, गोपीचंद पाटील, सचिन सावंत,सचिन मुरमे, नितीन मुरमे,सोयल तांबोळी, निखिल मोरे, यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.


--------------------------------


राष्ट्रवादीच्या वतीने प्रत्येक मजुराला अल्पोपहार आणि पाण्याचा पुरवठा



हाताचे काम गेल्यामुळे खिशात दमडीही शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे वाहनांतून गावीही देखील जाता येत नाही. परिणामी, उपाशीपोटी चालत जाण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही. अशा मजुरांची क्षुधाशांती करण्याचे व्रत गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नियोजनानुसार माजी विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी अंगीकारले आहे. नाशिक हायवेवरील खारीगाव टोल नाका ते माणकोली नाका दरम्यान ते आपल्या कार्यकर्त्यांसह दिवसभर थांबून जाणार्‍या प्रत्येक मजुराला अल्पोपहार आणि पाण्याचा पुरवठा करीत आहेत.