कळवा येथील रिक्षा चालकांना मदतीचा हाथ

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कळवा येथील रिक्षा चालकांना मदतीचा हाथ


ठाणे


 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाँऊनमुळे आपला व्यवसाय बंद ठेवावा लागल्यामुळे  घरी बसलेल्या निराधार रिक्षाचालकांच्या मदतीला स्थानिक खासदार डॉ श्रीकांत शिंदे धावून आले आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील विविध क्षेत्रामध्ये ५० हजारहून अधिक धान्य वाटप करण्यात आले असून कळवा, खारीगाव, विटावा या क्षेत्रात देखील रिक्षा चालकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये एक पाहायला मिळतंय कि रिक्षाचालक देखील संचारबंदीचा व सोशल दिस्टन्सिंगचा काटेकोरपणे पालन करत डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे मोफत धान्य वाटप या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महिला संघटक लता पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र साप्ते, उमेश पाटील, नगरसेवक गणेश कांबळे, नगरसेविका प्रियांका पाटील, विभाग प्रमुख विजय शिंदे, अविनाश पाटील, नंदू पाटील याच्या उपस्थितीत धान्य वाटप झाला