शाळेच्या मिनी बसेस, व्हॅन रुग्णवाहिकांसाठी वापरण्याची तयारी सुरू

शाळेच्या मिनी बसेस, व्हॅन रुग्णवाहिकांसाठी वापरण्याची तयारी सुरू



ठाणे


ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या दीड हजारांपेक्षा अधिक झाली आहे. महापालिकेकडे सद्य:स्थितीत जेमतेम २० रुग्णवाहिका उपलब्ध असून ही संख्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्यामुळे उपचारांअभावी काही रुग्णांना प्राण गमवावे लागल्याच्या तक्रारी असून महापालिका प्रशासनाला राजकीय रोषासही सामोरे जावे लागत आहे. कमतरता भरून काढण्यासाठी टीएमटीच्या मिनी बसगाडय़ांचे रूपांतर रुग्णवाहिकांमध्ये केल्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील आणि महापालिका हद्दीबाहेरील शाळेच्या मिनी बसेस, व्हॅन रुग्णवाहिकांसाठी अधिग्रहित करण्याची तयारी सुरू केली आहे.याशिवाय शहरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने महापालिकेस मिळाल्यास त्यांचा वापरही रुग्णवाहिकांसाठी केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांनी दिली.


वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्णवाहिकांची कमतरता भासू लागल्याने परिवहन उपक्रमाच्या मिनी बसगाडय़ांचे रुग्णवाहिकेत रूपांतर करणाऱ्या ठाणे महापालिकेने रुग्ण वहनासाठी जिल्ह्य़ातील शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांच्या मिनी बसेस आणि व्हॅन अधिग्रहित करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यामार्फत महापालिकेने परिवहन विभागाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला असून विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाडय़ा तात्पुरत्या स्वरूपात मालकांच्या परवानगीने रुग्णवाहिकांमध्ये रूपांतरित केल्या जाणार आहेत.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image