पर्यावरणपुरक गणेशउत्सव साजरी करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांचे पर्यावरण मंत्र्यांना पत्रं
ठाणे
प्रदूषणाला जर आळा घालायचा असेल तर आपण सर्वांनी ECO Friendly म्हणजे शाडूच्या मातीपासून बनलेल्या गणेश मुरत्या वापरायला हव्यात. शिवसेनेचे आमदार श्री प्रताप सरनाईक साहेब यांनी पर्यावरणमंत्री श्री आदित्य ठाकरे यांना पत्रं लिहून यावर्षीपासून १००% पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सरकारने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. कागदाच्या लगद्यापासून मोठ्या मुरत्या आणि शाडूच्या मातीपासून छोट्या मुरत्या बनवण्या संदर्भात आपण निर्णय घेणे जरुरीचे आहे. तसेच ज्या मूर्तिकारांनी अगोदरच POP पासून मुरत्या बनवल्या आहेत त्या मुरत्या राज्य सरकारने स्वतःकडे घेऊन त्याचा जो मोबदला आहे तो मूर्तिकारानं द्यावा, जेणे करून त्यांना देखील नुकसान होणार नाही. असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.
गणेशउत्सव हा सर्वांसाठी भक्तीचा आणि शक्तीचा सण. अवघा महाराष्ट्र त्या ११ दिवसांच्या काळात भान हरपून आपल्या गणरायाचे पूजन करत असतो. उत्साह शिगेला असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हा उत्सव साजरा करतात.....कोणी ढोल-ताशे वाजवून, गुलालाची उधळणं करून, सुंदर देखावा करून, फटाक्यांची आतषबाजी करून इत्यादी. कोकणात अगोदरपासून शाडूच्या मातीच्या सुंदर सुबक मुरत्या घडवल्या जातात, पुण्यातही बहुतांश तीच परंपरा आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मुंबई, ठाणे, नाशिक किंवा इतर परिसरात आपण Plaster of Paris च्या मुरत्या बनवण्यावर अधिक भर देतो. त्यामुळे विसर्जन करतांना समुद्रात POP मुळे प्रदूषण निर्माण होते. निसर्गाला कुठेतरी हानी त्यामुळे पोहचते.