लोकप्रतिनिधी, नागरिकांना माहिती देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची कोव्हीड 19 वॅार रूम
24 तास अधिकाऱ्यांची नियुक्ती, लोकप्रतिनिधी, नागरिक समन्वयासाठी प्रशासनाची योजना
ठाणे
कोव्हीड 19 चा सामना करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करतानाच कोव्हीड 19 च्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांना मिळावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने 24 तास वॅार रूम कार्यानिवत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे. या वॅाररूमध्ये 24 तास अधिकाऱी आणि डॅाक्टारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वॅार रूमच्या माध्यमातून नागरिकांकडून येणाऱ्या सर्व तक्रारींचे समाधानकारक निराकरण करणे, तक्रारीच्या अनुषंगाने महापलिकेच्या संबंधित विभागाशी अथवा शासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय ठेवणे, मंत्रालय कोव्हीड19 वॅार रूमशी समन्वय ठेवणे, कोरोना बाधित रूग्णांना आवश्यकता पडल्यास रूग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी मार्गदर्शन करणे, रूग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने समन्वय ठेवणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या वॅार रूमध्ये तीन पाळयांमध्ये कार्यकारी अभियंता नितीन येसुगडे (भ्रमणध्वनी क्रमांक 8879600724), रामदास शिंदे (भ्रमणध्वनी क्रमांक 9769007799), सुधीर गायकवाड (भ्रमणध्वनी क्रमांक 9869737874) यांची कक्ष प्रमुख नियुक्ती करण्यात आली तर उप अभियंता महेश बोराडे (भ्रमणध्वनी क्रमांक 987009686), भगवान शिंदे (भ्रमणध्वनी क्रमांक 9892493287) आणि प्रशांत भूवड (भ्रमणध्वनी क्रमांक 9769600007) यांची सहाय्यक कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीनही पाळ्यांमध्ये डॅा. माधुरी देवल (भ्रमणध्वनी क्रमांक 9821277551), डॅा. भरत कुलथे (भ्रमणध्वनी क्रमांक 8329284399) आणि डॅा. आशिष सिंग (भ्रमणध्वनी क्रमांक 9930931986) या वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित रूग्णांस त्यांच्या आजाराच्या अनुषंगाने उपचारासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वॅार रूमसाठी एक रूग्णवाहिका (वाहन क्रमांक MH04JK 2085, वाहन चालक (प्रथमेश बोधारे, भ्रमणध्वनी क्रमांक 9004779262),शहवाहिका (वाहन क्रमांक MH04FK 2932, वाहन चालक नामदेव दगडू नागरे, भ्रमणध्वनी क्रमांक 9773873771) ही दोन वाहने ठेवण्यात आली आहेत.