मुंब्र्यात जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त खुली असणारी इतर २० दुकाने सील
ठाणे
कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत फक्त अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना सुध्दा इतर जी दुकाने उघडण्यात आली होती, अशी 20 दुकाने मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात सील करण्यात आली आहेत. सरकारी कामात अडथळा व रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या चौघाजणांवर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केली.
मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील सलमान एन्टरप्रायजेस, ओमेजा सर्व्हीस सेंटर, विजय इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअर, अंबिका स्वीट मार्ट -संजय नगर, जमान ऑटो पार्टस- गणेशभुवन, सिमरा बुक स्टॉल,रिगट पॅलेस मोबाईल स्टोअर्स, सुनिल लाईम डेपो - अचानकनगर, मदन चिकन शॉप- अलमास कॉलनी, चॉईस कॉर्नर - जीवनबाग, ए.एस. टेलिकॉम – मुंब्रा मार्केट रेल्वे ट्रॅकजवळ, स्टिल शॉप – खैरुनिसा बिलिडंग, बाबाजी हार्डवेअर- आनंद कोळीवाडा, तंदुरी दरबार, मॉडर्न फूटवेअर - अमृतनगर, रिदा फॅशन सेंटर – किस्मत कॉलनी, रिहास वस्सुन केक- नॉशिन प्लाझा शॉप, कौसा, सुलतान मेन्स वेअर टेलर, रॉयल कल्केशन – रशिद कंपाऊंड नाका, जिओ इलेक्ट्रॉनिक्स – कौसा पेट्रोलपंपजवळील दुकाने सील करण्यात आली. तर सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या व साथरोगप्रतिबंध कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या अन्वर सय्यद, पापा, अब्दुल गनी मर्चंट, डॉ. एस.एफ. रजा, फैजान शेख यांच्यावर कलम 353 व 188 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी केली.