आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल- मजुरांची कैफियत

आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल- मजुरांची कैफियत



ठाणे 


हाताला काम नाही आणि दोन वेळचे खायलाही पैसे नाहीत. मग मुंबईत राहून करायचे काय? यदाकदाचित कोरोनासारखा आजार झालाच तर निदान आमच्या कुटुंबासमोर गावी मरण आले तरी चालेल, असे म्हणत अनेक मजूर पायी चालत अद्यापही आपल्या गावी जात आहेत.. मुंबईतील शेकडो मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा गटा- गटाने पायीच परराज्यातील गाव गाठण्यासाठी प्रवास करीत आहेत. मुंबई ते उत्तर प्रदेश या सुमारे १५०० किलोमीटरच्या प्रवासाला किती काळ लागेल, हे माहिती नाही. पण, इथे होणा या हालअपेष्टांपेक्षा पायी जाऊन, थोडे हाल आणखी सोसून आपले मूळ गाव गाठू,असे या मजुरांचे म्हणणे आहे.


. कोरोनाच्या संचारबंदीमुळे हाताला काम नाही. त्यात जवळचे सर्व पैसे संपले आहेत. काम शोधण्यासाठी बाहेर पडलो, तर पोलिसांचा मार खावा लागतो,  संसर्ग झालाच तर इथे मरण्यापेक्षा, तिकडे जाऊन आजाराशी लढा देत कुटूंबियांजवळ मरण आले तरी चालेल, अशी धारणा या मजुरांची झालेली आहे.


एक दोन किलोचे धान्य सुरुवातीला काही दिवस काही सामाजिक संस्थांकडून मिळाले, पण त्यावरही किती दिवस काढणार? असाही प्रश्न आहे. गावीच काहीतरी कामधंदा करु, अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन मार्गावरुन नाशिकच्या दिशेने जाणा या आणखी एका गटातील फुले रावत (२६, रा. रे रोड, मुळ रा. इटावा, उत्तर प्रदेश) म्हणाला, गेल्या दहा वर्षांपासून मुंबईत राहतो. मुंबईत कपड्याच्या मार्केटींगचे तो काम करतो. दोन महिने गावाहून पैसे मागवून आणि कर्ज काढून दिवस काढले. आता मिळकत काहीच नाही. मग जगणार कसे, असा त्याचा प्रश्न आहे. सूरजकुमार (३५, रा. दारुखाना, मुंबई, मूळ गोंडा (उत्तरप्रदेश) हा दहा वर्षांपासून टॅक्सी चालवितो. तो ७ मेपासून पायीच घराबाहेर पडला.