शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर लोकप्रतिनिधींचा डल्ला

शासनाकडून मिळणाऱ्या मदतीवर लोकप्रतिनिधींचा डल्ला



ठाणे
कोरोनाला संधीप्रमाणे बघून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाण्यात सुरु असल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाउन झाल्यानंतर सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून रोज कमावून रोज खाणाऱ्या आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी किराणा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यामध्ये काही सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून ही योजना पुढे सुरु ठेवावी, असे सांगण्यात आले. परंतु मधल्या काळात अन्नधान्याऐवजी हातावरील पोट असणाऱ्यांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण देण्यात यावे, अशी संकल्पना पुढे आली. महापालिकेकडे हा उपक्रम आल्यानंतर या योजनेला पूर्णत: हरताळ फासला केला. अनेक राजकीय मंडळी, बड्या नगरसेवकांनी शेकडो टन तांदूळ, दाळ, तेल, मीठ उचलले. दोन ते तीन दिवस काहींनी हे किचन शासनाच्या पथकाला दाखवले. परंतु आता अनेक ठिकाणी हे किचन बंद झाले असून, काही नतद्रष्ट राजकीय मंडळींनी शासनाच्या किराणा साहित्यावर डल्ला मारण्याचे प्रताप केले आहेत. 
ही मदत शासनाकडून येत असतानाही राजकीय मंडळी लोकप्रतिनिधी ही मदत आपण करीत असल्याचे प्रभागातील नागरिकांना भासवत असुन तयार जेवण देण्याऐवजी अन्नधान्य आपापल्या प्रभागांमध्ये वाटण्याचे काम सुरू झाले आहे. एवढेच काय, काहींनी तर या साहित्याच्या पाकिटांवर आपले बॅण्डिंग केल्याची धक्कादायक माहितीही पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आलेल्या या मदतीसाठी शासनाकडून त्यात्या भागात फलकही लावले जात आहेत. मार्केटींग करणाऱ्या नगरसेवकांनी शासनाची मदत घेतल्यानंतर असे फलक लावण्यास मज्जाव केला आहे. काहींनी तर शासनाच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करुन, तुमचे फलक लावले तर आम्ही परत निवडून येऊ शकणार नाही, असे म्हणत फलक लावण्यास विरोध करत आहेत. 


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image