सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही गरिबांसाठी कोविड -१९ वर मोफत उपचार

 होरायझनपाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही गरिबांसाठी कोविड -19वर मोफत उपचार सुरू ..,.



ठाणे


होरायझन प्राईम हाॅस्पीटलपाठोपाठ आता सफायर आणि वेदांत हाॅस्पीटलमध्येही ठाणे महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 बाधित गरीब गरजू नागरिकांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आली आहे.शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना कोव्हीड - १९ घोषित केलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना कमीत कमी दरात योग्य उपचार मिळावेत यासाठी महापालिका प्रशासन आग्रही होते याच पार्श्वभूमीवर पिवळे केशरी रेशनकार्डधारक व मध्यम उत्पन्न गटातील नागरीकांना हॉरिजॉन प्राईम हॉस्पिटलमध्ये याधीच मोफत उपचार सुविधा सुरू करण्यात आले असून आता सफायर आणि वेदांत हॅास्पीटलमध्येही ही योजना सुरू करण्यात आली आहे.या रुग्णालयात गरजू व वंचितांना मोफत  कोविड -१९ उपचार मोफत दिले जाणार आहेत. 


शहरातील कोव्हीड बाधित गरीब नागरिकांना  सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत दाखल केले जाणार आहे. या योजनेंतर्गत उच्च प्रतीचे उपचार, अत्याधुनिक सुविधा व पौष्टिक जेवण सर्व रूग्णांना विनामूल्य उपलब्ध देण्यात येणार आहे. या योजनेसाठी नि:शुल्क हेल्पलाईन नंबर 14555 / 1800111565 - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, 155388 / 18002332200 - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अधिक माहितीसाठी ०२२ - २५३३३२२२या क्रमांकावर  तर वेदांत हाॅस्पीटलसाठी  ०२२-२५९८८०००/०३, ९८९२५०७७०० या संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Popular posts
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image