महापालिका आयुक्तांनी केली कळवा-माजिवडा नालेसफाईची पाहणी

महापालिका आयुक्तांनी केली कळवा-माजिवडा नालेसफाईची पाहणी
प्रतिबंधित क्षेत्राचाही घेतला आढावा



ठाणे


ठाणे महानगरपालिका क्षेत्रात नाले सफाईच्या कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या आपत्तीला सामोरे जावू लागू नये या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कोरोना कोव्हीड १९ सोबत नाले सफाई मोहिम अधिक वेगवान करण्याच्या कामालाही प्राधान्य दिले असून आज त्यांनी कळवा आणि मुंब्रा प्रभाग समितीतंर्गत नाले सफाई कामाची पाहणी केली. दरम्यान महापालिका आयुक्तांनी आपल्या पाहणी दौऱ्यात या दोन्ही प्रभाग समितीतंर्गत प्रतिबंधितक्षेत्राचा आढावा घेतला.
सिंघल यांनी दुपारपासून कळवा प्रभाग समितीपासून नाले सफाई कामाच्या पाहणीला सुरूवात केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी कावेरी सेतू, चिंधी नाला, शांतीनगर आदी मुख्य नाल्यासह अंतर्गत नाल्याचीही पाहणी केली. यावेळी त्यांनी सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे याच्यासोबत प्रभाग समितीमधील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून त्याची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आहे याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत सुरू असलेल्या नाले सफाईची पाहणी केली. यामध्ये त्यांनी लोढा कॅाम्प्लेक्स येथील नाल्याची पाहणी केली. यावेळी सिंघल यांनी पावसाळ्यात पाणी साचणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा विभागाचे उप आयुक्त अशोक बुरप्पले, डॅा. हळदेकर, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे आदी उपस्थित होते