वाढदिवसानिमित्त पशू-पक्ष्यांना मेजवानी
ठाणे :
मनसे नेते अमित ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने तो साधेपणाने साजरा करायचा परंतू काय करावे. यावर ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी चक्क पशूपक्ष्यांनाच मेजवानी देऊ केली. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मेजवानी ठाण्यातील डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेच्या रेस्क्यू सेंटरमधील पशूपक्ष्यांना मिळाली.
लॉकडाऊन काळात आवडीचे पदार्थ खायला मिळाल्याने या पक्ष्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांकडे आपला आनंद व्यक्त करुन दाखविला. पशूपक्ष्यांच्या मेजवानीसोबतच रस्त्यावरील भटक्या श्वानांचे लसीकरणही रविवारी करण्यात आले. ठाण्यातील कोकणापाडा भागातील डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेच्या पशुपक्षींच्या रेस्क्यू सेंटरमधील माकड, पोपट, गरुड, घुबड, मांजर, कासव आदी पशू पक्ष्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिले. लॉकडाऊनमुळे पशू पक्ष्यांनाही आवडीच्या खाद्यपदार्थ्यांना थोडी मुरड घालावी लागली आहे. त्यांच्या आवडीचे पदार्थ मिळविताना संस्थांनाही खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. वाढदिवसानिमित्त मात्र या पशू पक्ष्यांना आवडीचे खाद्यपदार्थ मिळाल्याने त्यांनीही आनंद व्यक्त करीत ते पदार्थ गट्टम केले.