सफाई कामगारांना संपूर्ण वेतन कधी मिळणार

सफाई कामगारांना संपूर्ण वेतन कधी मिळणार


ठाणे



 महाराष्र्ट शासन कामगार आयुक्त यांनी लाॅक डाउन च्या काळातील वेतन कपात करु नये.असे निर्देश दिलेले असतानाही ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागात शाळा साफ सफाईचे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन दिले जात नाही. अशी बाब निदर्शनास आली आहे.    मार्च महिन्याचे अर्धवट पगार दिले आहे.जर मार्च व एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही, तर कामगारांवर उपासमारीची वेळ येईल. त्यात मे महिन्याचाही पगार मिळत नाही .जून,जुलै कधी शाळा सुरु होईल याचा भरवसा नाही. लाॅक डाउन मुळे सफाई कामगारांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झाली आहे.घर चालविणे कठीण झाले आहे. कामगारांमध्ये असंतोष र्निमाण होत आहे.अशा परिस्थितीत कामगार रस्त्यावर उतरले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आयुक्तांना विनायक आंब्रे, सुनिल दिवेकर यांनी पत्राद्वारे विचारला आहे. सदर पत्र ई मेलद्वारे आयुक्तांना पाठवून अद्याप काहीही उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री महाराष्र्ट शासन यांनाही निवेदन पाठवण्यात आले आहे.
   ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागात शाळा साफ सफाईचे काम करणारे सुमारे १८० सफाई कामगार कार्यरत आहेत. त्यामध्ये ८०% महीला कामगार आहे.मार्च महिन्यामध्ये करौना संसर्गामुळे १६ मार्च पासुन शाळेला सुट्टी जाहीर झाल्यामुळे कामगार कामावर जावू शकले नाही. नंतर संपूर्ण देश ठाणे लाॅक डाऊन करण्यात आले. परंतू शाळामध्ये स्थलांतरीत मजुरांसाठी सोय करण्याच्या उद्देशाने   ३० व ३१ मार्च रोजी शाळेत साफ सफाई साठी बोलाविले होते.त्यावेळेस  काम केलेले आहे. 


 


Popular posts
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image