मजूरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठाणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मदत
मजूरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठाणे मनपा विरोधी पक्षनेत्या सौ.प्रमिला मुकुंद केणी यांचा खारीचा वाटा 

 

ठाणे

गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मनपा विरोधी पक्षनेत्या सौ.प्रमिला मुकुंद केणी यांनी  रखरखत्या उन्हात आपल्या गावाकडे पायी निघालेल्या मजूरांना  नाशिक महामार्गावरील खारीगाव टोलनाक्यावर दररोज दोन हजार पाणी बॉटल व खाद्यपदार्थांचे वाटप करून त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. 

 

 कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. व्यवहार ठप्प आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक आणि अन्य प्रांतातील अनेक मजूर लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक जिह्यांत अडकून पडले आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध जिह्यातील मजूरही जिल्हाबंदी मुळे मुंबई, ठाणे आणि पालघर मध्ये लॉकडाऊन आहेत. या मजूरांना हाताला काम नाही आणि हाती असलेले पैसे पण संपले आहेत. अशा स्थितीत आपसूकच त्यांचे पाय आता गावाकडे म्हणजे त्यांच्या राज्यांकडे, जिह्यांकडे वळले आहेत. आकाशातून सूर्य आग ओकत आहे अशाही परिस्थितीत ते मुलाबाळांना खांद्यावर घेऊन पायी चालत निघाले आहेत. हे चित्र फार हृदयद्रावक आहे. या मजूरांना थोडासा दिलासा म्हणून ठाणे मनपा विरोधी पक्षनेत्या सौ.प्रमिला मुकुंद केणी आणि मुकुंद केणी यांनी सदर उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. दररोज दोन हजार पाण्याच्या बॉटल आणि खाद्य पदार्थ देण्यात येणार आहे.