४६ अधिकाऱ्यांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस पुन्हा ड्युटीवर रुजू

४६ अधिकाऱ्यांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस पुन्हा ड्युटीवर रुजू



ठाणे  


कोरोनाबाधित नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे पोलीस मुख्यालयासह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचारी हे बाधित झाले. या कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील अनेक पोलिसांना घरात तसेच केंद्रांत विलगीकरणामध्ये राहावे लागले. त्यामुळे त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती मिळाली होती. यातील बहुतांश जणांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपल्यामुळे हे सर्वजण आता पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत. कोरोनाबाधित पोलीस तसेच नागरिकांच्या संपर्कातील हायरिस्कमधील ४६ अधिका यांसह २४८ कर्मचारी असे २९४ पोलीस पुन्हा ड्युटीवर रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.अनेकांनी कोरोनावर मात केल्यामुळे पोलिसांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.


ठाणे पोलीस मुख्यालयात एका अधिका यासह 103 मुंब्रा पोलीस ठाण्यात १७ अधिका यांसह ६९, वर्तकनगर तीन अधिका यांसह ३० कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे २१ असे आतापर्यंत २९४ पोलीस रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत १४ अधिकारी आणि ९७ कर्मचारी अशा 111 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यात एका महिला कर्मचा याचा मृत्यू झाला. सात अधिकारी आणि ४२ कर्मचारी अशा ४९ पोलिसांनी कोरोनावर मात केली. सध्या सात अधिकारी आणि 54 कर्मचारी अशा ६१ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. पोलीस मुख्यालयात सर्वाधिक २२ त्यापाठोपाठ मुंब्रा १५ तर कळव्यात १२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. राज्य राखीव दलासह शीघ्र कृतीदलही कळवा, मुंब्रा आणि वागळे इस्टेट भागात तैनात केल्याने पोलिसांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image